Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यांत सर्वत्र गणेश उत्सवाला सुरुवात

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे


बीड जिल्ह्यांत सर्वत्र गणेश उत्सवाला सुरुवात 



वाकनाथपुर | प्रतिनिधी-: कोरोंना महामारी मुळे गेली दोन वर्ष सर्व  गणेश भक्तांना घरात राहूनच गणेश उत्सव साजरा करावा लागला कोणाला ही घराच्या बाहेर निघता येत नव्हतें परंतु या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने गणेश भक्त खूप आनंदात आहेत. गेल्या काही दिवसापासूनच गणेश भक्त गणेश स्थापना करण्यासाठी  कामाला लागले आहेत जागोजागी सजावटीचे काम करत आहेत. जागोजागी डेकोरेशन मंडप प्रत्येक गल्ली सजावटीने गजबजून गेली आहे आणी आज गणेश मूर्तीची स्थापना करून गणेश भक्त खूप आनंदात असतात दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा आरती करतात  गोड प्रसाद करतात आज बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक वाड्या वस्ती येथे आपल्या लाडक्या गणरायाचे वाजत गाजत आगमन होत आहे आणी सर्वत्र आनंद पाहायला मिळत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा