Subscribe Us

header ads

विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश,

बीड स्पीड न्यूज 

विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश,

मुंबई-: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे मेटेंचा अपघात झाला. मात्र, अपघातानंतर विनायक मेटेंना मदत तातडीने मदत मिळाली नाही. ते काही तास घटनास्थळीच पडून होते, असा आरोप मेटेंसोबत असलेल्या सहकाऱ्याने केला आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे.

घटना दुर्दैवी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच, विनायक मेटेंच्या सहकाऱ्याने घटनास्थळी वेळेवरर मदत पोहचली नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात माहिती तपासली जाईल. संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक