Subscribe Us

header ads

रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य च्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धाचे आयोजन


बीड स्पीड न्यूज 


रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य च्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धाचे आयोजन



बीड प्रतिनिधी :रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 18 वयोगटाच्या आतील विषय १)माझा आवडता छंद २) माझे आवडते समाज सुधारक ३) कोराना काळातील सुट्टीतील माझा एक क्षण ४) माझे आई-वडील.  वयोगट 18 ते पुढील खुला वर्ग विषय १)माझ्या भविष्यातील भारत २) स्वच्छ भारत  ३) वृक्षरोपण ही काळाची गरज ४) मी केलेले एक समाजकार्य ५) आजची सक्षम महिला. या विषयावर ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सदरील स्पर्धा ही जनजागृती व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पर्धा आयोजित केलेली आहे.रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य सामाजिक शैक्षणिक व इतर कार्यामध्ये  सदैव अग्रेसर असून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.संपर्कासाठी  रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य संपर्क क्रमांक 7035 358 358 दिनांक 13 / 8/ 2022 सायंकाळी 8:00 वाजे पर्यंत निबंध व आपले नाव पत्ता मोबाईल नंबर पाठवावे सर्व स्पर्धकांना प्रवेश मोफत असून सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा