Subscribe Us

header ads

संत सोपान काका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


संत सोपान काका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

परळी  / प्रतिनिधी-: श्रीकृष्ण अष्टमी निमित्त परळी येथील श्री संत सोपान काका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दि. 17 ते 24 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. परळी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परळी येथील संत सोपान काका मंदिर येथे बुधवार दिनांक 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान श्री कृष्णाष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या 7 दिवस चालणाऱ्या सप्ताहात महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प लिंबाजी महाराज तिडके मांडवेकर, ह भ प माधव महाराज उखळीकर, ह भ प भागवताचार्य गोविंद महाराज मुंडे नंदनज , ह भ प भागवताचार्य मारुती महाराज हरंगुळकर लातूर, ह भ प भागवताचार्य सुरेंद्र महाराज उखळीकर, ह भ प भागवताचार्य प्रभाकर महाराज झोलकर, ह भ प भागवताचार्य विनायक महाराज शिंदे मानोलीकर, तर शेवटी काल्याचे किर्तन ह भ प भागवताचार्य विठ्ठल महाराज उखळीकर करणार आहेत , अशा ख्यातनाम प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन दररोज रात्री 9 ते 11 दरम्यान होणार असून या सप्ताह निमित्त दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 विष्णू शस्त्र नाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते दुपारी 1 गाथा भजन, दुपारी 2 ते 4 रामायण, 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 धुपारती आणि रात्री 11 ते 1 जागर , याप्रमाणे होणार असून ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह भ प विठ्ठल महाराज उखळीकर व ह भ प महादेव महाराज उखळीकर हे करणार असून गाथा भजन नेतृत्व श्री ह भ प सत्यनारायण महाराज मुरकुटे व ज्ञानेश्वर महाराज उखळीकर तसेच फडावरील सर्व भजनी मंडळी करणार आहेत तरी भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताह किर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोपान काका उखळीकर फडाचे ह भ प केशव महाराज उखळीकर, ह भ प विठ्ठल महाराज उखळीकर, ह भ प विश्वंभर महाराज उखळीकर, आणि ह भ प दीनानाथ उत्तम महाराज उखळीकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा