Subscribe Us

header ads

पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल






वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड जिल्हा गुन्हेगारी वाढत चालली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना ही आता मारहाण सुरु झाली आहे.बीड तालुक्यातील मौजे काळेगाव येथील अनिल माणिक पवार (वय ३२ वर्ष)  हे महावितरण कार्यालय पिंपळनेर येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन कार्यान्वित आहेत. सध्या बील वसुली चालु असल्याने ते आज दिनांक ४ ऑगस्ट वार गुरुवार रोजी परभणी (केसापुरी) येथे गेले असता तेथे त्यांना गावकऱ्यांनी सांगितले की डी पी जवळ आरतींग ची तार तुटली आहे ती तार जोडत असतांना तेथे गावातील सुधीर सुखदेव शिंदे आणि सचिन नारायण शिंदे हे दोघे तेथे आले आणि अनिल 

माणिक पवार यांना तु जुने केबल का वापरतो नवे केबल टाक असे म्हणत शिवीगाळ करत लाथा आणि चापटाने मारहाण केली. आणि तु परत गावात येऊ नको नाहीतर तुला चालु डी पी वर फेकुन देऊ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली सुधीर सुखदेव शिंदे आणि सचिन नारायण शिंदे यांच्या कडून माझ्या जिवाला धोका आहे अशी फिर्याद अनिल माणिक पवार यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिली आहे.आरोपी विरुद्ध 353,332,504,506,34,  प्रमाणे पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचे समजताच महावितरण कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने पिंपळनेर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा