Subscribe Us

header ads

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नोएडा येथे अभ्यास दौरा.


बीड स्पीड न्यूज 


दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नोएडा येथे अभ्यास दौरा.


परळी( प्रतिनिधी ) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच व्यक्तीमत्त्व विकासाला वाव मिळावा या उद्देशाने शाळेतील विविध उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकीत संस्थेत अभ्यास दौर्यावर पाठवण्याची परंपरा २०१८-१९ पासून चालू करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शाळेतील १० विद्यार्थ्यांनी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल नोएडा १० दिवसाच्या अभ्यास दौर्यावर पाठवण्यात आले. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे- 

१ दिग्विजय गुट्टे ,२ व्यंकटेश कराड ,३ अनन्या मुंडे ,४  समीक्षा कराड ,५ अमरनाथ कराड ,६ सार्थक साखरे 
७ अदविता धर्माधिकारी ,८ अफान शेख ,९ आर्या नावंदर ,१० अजिंक्य देशमुख केवळ शैक्षणिक गुणवत्तेच्या नाही तर शाळेतील उपक्रमांत जसे की चित्रकला, संगीत, क्रिडा ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्या प्राप्त केले आहे त्यांना देखील अभ्यास दौर्यावर पाठवण्यात येते.  इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंत प्रत्येक वर्गातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यातील कला गुणांना अजून वाव मिळावा म्हणून लहान वयातच नामांकीत संस्थांना १० दिवसांची भेट देण्याच्या संधी देण्यात येते. विदेशांतील व मोठ्या शहरांतील शाळेतील शैक्षणिक वातावरण, शिक्षण पद्धती, नविन भाषा, मित्र बनवण्याची संधी प्राप्त झाल्याने विद्यार्थींचा आत्मविश्वास वाढतो. तसेच आपल्या आवडीच्या व प्राविण्य प्राप्त क्षेत्रांत करिअर करण्यासाठी देखील मदत होते. सुरवातीला 2018 - 19 शैक्षणिक वर्षात प्रेरणास्थान श्री . किरण  गित्ते ( IAS) तसेच विवेकानंद युथ वेलफेयर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषा गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ४ गुणवंत विद्यार्थ्यांना सिंगापूर देशातील नामांकीत शाळेत पाठवण्यात आले होते. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी असल्याने यामध्ये खंड पडला होता.परंतु यावर्षी पुन्हा उपक्रम सुरू केल्याने विद्यार्थ्यांना अनमोल संधी प्राप्त होत आहे. परिसरातील पालकांनी व नागरिकांनी शाळा प्रशासनाचे कौतुक केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा