Subscribe Us

header ads

श्रमसाफल्य मजुर संस्थेच्या चेअरमनपदी धनंजय राख

बीड स्पीड न्यूज 
 
श्रमसाफल्य मजुर संस्थेच्या चेअरमनपदी धनंजय राख


बीड दि.१६ (प्रतिनिधी):सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.शिरूर कासार) यांच्या अध्यक्षतेखाली  तालुक्यातील श्रमसाफल्य मजुर सहकारी संस्था मर्यादित बोरगाव (च.) या संस्थेच्या नवनिर्वाचित समिती सदस्यांची अधिसूचित केल्याप्रमाणे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सन २०२१ ते २०२६ या वर्षासाठी श्रमसाफल्य संस्थेच्या चेअरमनपदी धनंजय जयंतराव राख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१९ चे नियम ७७ अन्वये अधिसूचित केल्यानुसार सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज आल्याने धनंजय जयंतराव राख यांची ५ वर्षासाठी बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली. सचिवपदी बबन पांडुरंग महागुरू यांची निवड करण्यात आली.सदर बिनविरोध निवडीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जिल्हा मजुर सहकारी संस्थाचा संघाचे चेअरमन बन्सीअण्णा सिरसाट, ॲड जयंत राख, रामरावजी राख, संजय राख, बोरगावचे सरपंच श्रीमती छबुताई राख, ॲड. बाबासाहेब राख, सचिव महागुरू,  इंजि. धनंजय मुंढे, भगवानराव पाखरे, भागवतराव खेडकर, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  धनंजय राख गेवराई पंचायत समितीचे माजी सदस्य रामराव राख यांचे नातू तर ॲड.जयंत राख यांचे चिरंजीव आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा