Subscribe Us

header ads

शेख सालिक रिजवानहुसेन स्वातंत्र्यदिनी सुवर्ण पदकाने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी शेख फिरोज

शेख सालिक रिजवानहुसेन स्वातंत्र्यदिनी सुवर्ण पदकाने सन्मानित


अंबाजोगाई प्रतिनिधी-: अंबाजोगाई योगेश्वरी नूतन विद्यालय  येथील विद्यार्थी शेख सालिक रिजवानहुसेन याचा पंच्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्यदिनी सुवर्ण पदकाने सन्मान करण्यात आला.शेख सालिक याने इयत्ता पहिली मध्ये महाराष्ट्र टॅलेंट सर्च ऑलंपियाड परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक मिळवला.यानिमित्त त्याला आज भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मान्यवरांकडून सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे विभागप्रमुख ठाकूर सर, ढगे सर, गंगणे मॅडम, ढगे मॅडम, दिलदार फाऊंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख ईस्माईल व ईतर मान्यवर उपस्थित होते. या देदीप्यमान यशामध्ये सालिक ला आई-वडील, ढगे सर, गंगणे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तो सांगतो. भविष्यात क्लास वन अधिकारी बनुन देश सेवा करणार असल्याचे मनोगत यावेळी शेख सालिक रिजवानहुसेन ने व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा