Subscribe Us

header ads

मध्यान भोजन योजनेची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करा -- भिम स्वराज्य कामगार संघटनेची मागणी

बीड स्पीड न्यूज 


मध्यान भोजन योजनेची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करा -- भिम स्वराज्य कामगार संघटनेची मागणी                             

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने नोंदणीकृत असंघटित कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना कार्यान्वित केली असून बीड जिल्हा कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अन्न पुरवठादारामार्फत ( गुत्तेदार) मार्फत भोजन पुरविण्याचे काम दिले असून या साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. संबंधित पुरवठादार  काही कार्यालयीन अधिकाऱ्यांना हताशी धरून कागदावर कामगारांची अधिकची संख्या दाखवून बेबनाव करत शासनाची फसवणूक करत आहे.कामगारांसाठी देत असलेले भोजन अतिशय बेचव असून निकृष्ट दर्जाचे गहू,तांदूळ,डाळीचा यात वापर होत असल्याचे अनेक कामगार बांधवाचे म्हणणे असून तशात तोंडी तक्रारी संघटनेकडे प्राप्त होत आहेत. त्याच अनुषंगाने व कामगार बांधवांच्या हितासाठी भिम स्वराज्य कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील मध्यान भोजन योजनेची चौकशी करून संबंधित अन्नपुरवठा करणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा सुरेशजी खाडे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा