Subscribe Us

header ads

नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण व बक्षीस वितरण संपन्न

बीड स्पीड न्यूज 



नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण व बक्षीस वितरण संपन्न

बीड (प्रतिनिधी) - शहरातील नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी दिनानिमित्त मा. आ. ॲड. सिराजोद्दीन देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजरोहण करण्यात आले. यानंतर अमृत महोत्सवी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरो स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या तसेच दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या सोहळ्यात अजहर आफाक, प्राचार्य सिद्दिकी नवीद, नासेरखान, मोमीन फहिमुद्दीन आणि इतर मान्यवरांसह शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या  संख्येने उपस्थित होते. प्रथम ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले. नंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगभरण स्पर्धेसह दहावी व बारावी च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सिराजोद्दीन देशमुख होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावी परीक्षेतील एकूण ८८ पैकी ८७ विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेचा निकाल ९८.८६% टक्के लागल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तर बारावी परीक्षेत एकूण ३३ पैकी ३३ विद्यार्थ्यांनी यश मिळवून महाविद्यालयाचा निकाल १००% लागल्याने या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. सिराजोद्दीन देशमुख, सचिव सुभाष चंद्रजी सारडा यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्दिकी नवीद यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने घेण्यात आलेल्या रंगभरो स्पर्धेत शाळेतून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व रजतपदक देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. अशा प्रकारे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ७५ वे स्वातंत्र्यदिन व बक्षीस वितरण समारंभ नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा