Subscribe Us

header ads

जनसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रेशनकार्ड व श्रावणबाळ योजना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई प्रतिनिधी: शेख फिरोज

जनसेवा बहुउद्देशीय  सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रेशनकार्ड  व श्रावणबाळ योजना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

अध्यक्ष अविनाश साठे यांचा स्तुत्य उपक्रम

अंबाजोगाई प्रतिनिधी दि २३ -: अंबाजोगाई तालुक्यातील जनसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वर्धापनदिना निमित्ताने आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश साठे यांच्या वतीने २०० पिवळे व केशरी रेशनकार्ड , तसेच १५० श्रावणबाळ , संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . यावेळी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना कुलकर्णी , पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे ,भक्तीप्रेम वृद्धाश्रमाचे पवन गिरवलकर , मराठी पत्रकार परिषदेचे बीडजिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर , मुशीर बाबा, श्रावनकुमार जाधव,फिरोज भाई,रौफ आतर ,समाजसेवक शेख मुक्तार गोविंद खरटमोल माणिक जोगदंड , हिफजत भाई , स्वच्छता निरीक्षक रमाकांत सोनकांबळे ,अंगणवाडी शिक्षिका छाया कुलकर्णी सचिन देवकर अर्जुन काळे गणपत साठे कुमार काळे गुणाजी होके यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस 

विविध थोर मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .प्रास्तविक सादर करताना संस्थेचे अध्यक्ष अविनाश साठे म्हणाले की आपण गेली पंधरा वर्षा पासुन समाजसेवक म्हणून काम करत आहे. सामाजिक काम करतांना किंवा उपक्रम राबविताना आपल्या हक्काचे विचारपीठ असावे या उद्देशाने २०१०-११ साली जनसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची निर्मिती करण्यात आली असल्याचे अविनाश साठे यांनी सांगितले. सदरील संस्थेच्या खाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत व याबाबत आनंद देखील व्यक्त केला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भक्तीप्रेम वृद्धाश्रमाचे संचालक पवन गिरवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . आज कुठलाही कार्यक्रम आयोजित करणे हे मोठे जिकरीचे व मोठया जवाबदारीचे काम असते. ती जवाबदारी अविनाश साठे यांनी लीलया पार पाडली याबद्दल गिरवलकर यांनी अविनाश साठे यांचे कौतुक केले .मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांनी आज तहसील कार्यालयात जे निराधार व वयोवृद्ध येतात त्यांची कार्यालयातील दलालांकडून आर्थिक लूट केली 

जाते याबाबत नाराजी व्यक्त केली . मात्र अशाही परिस्थिती अविनाश साठे यांची संस्था ही गरीब , निराधार व गरजवंत लोकांसाठी काम करते आहे याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले व यापुढेही त्यांच्या कडून असेच काम होत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महिला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी केला त्यांनी सांगितले की सध्याचे राजकीय नेते हे केवळ आश्वासन देण्यापालिकडे कुठलेही काम करत नाहीत  मात्र जनसेव ही सामाजिक संस्था आपल्या नावप्रमाणेच जनसेवा करत आहे . दिन दुबळ्या  पीडित नाराधार अशा लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अविनाश साठे आपल्या संस्थेअंतर्गत करत आहेत. आपल्या भागातील अंगणवाडीमध्ये लागणारे साहीत्य देखील त्यांनी वेळोवेळी पुरविले असल्याबद्दल साठे यांचे आभार व्यक्त केले अंगणवाडी शिक्षिका श्रीमती छाया कुलकर्णी यांनी देखील अविनाश साठे यांनी अंगणवाडी व येथील विद्यार्थी यांच्यासाठी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत यापुढेही त्यांच्याकडून अश्याच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भालेकर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक साठे,  सचिन होके युवराज काळे यशराज अलझेंडे तुषार साठे गणेश होके अभिमान साबळे आकाश खरटमोल समाधान साठे युनूस शेख नवाज शेख आदित्य कांबळे  सईद अहमद आदींनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा