Subscribe Us

header ads

माहिती अधिकार अर्जला पांगरदरवाडी ग्रामपंचायतने दाखवली केराची टोपली

बीड स्पीड न्यूज 


माहिती अधिकार अर्जला पांगरदरवाडी ग्रामपंचायतने दाखवली केराची टोपली



तुळजापूर-: तुळजापूर तालुक्यातील मौजे पांगरदरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत गावात झालेल्या विकास कामाच्या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते प्रमोद डोंगरे यानीं माहिती अधिकार अधिनियमात राज्य जन माहिती अधिकारी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांचेकडे (दि.२८/०६/२०२२ )रोजी अर्ज सादर केला असता संबंधित माहिती अधिकारी यानीं माहिती न देता अर्जाला केराची टोपली दाखवली आहे.ग्रामसेवक म्हणजे गावचा सेवक महत्त्वाचा नोकर असल्याने शासकीय धोरणानुसार सध्या मोलाचे महत्त्व आहे. ग्रामपंचायत कार्यालयात अनेक नोंदणी रजिस्टर पैकी प्रमोद डोंगरे यानी काही गावनमुने विभागाची माहिती अधिकार कायद्यान्वये रीतसर अर्जानुसार माहिती मागणी केलीे आहे. मात्र ग्रामसेवक यानी स्पष्टपणे अर्जला केराची टोपली दाखवली आहे. कारण माहिती देणे संदर्भात टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अर्जदाराने माहिती अधिकार अधिनियमात मागणी केलेली माहिती न देणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर कडक कारवाई होणे बाबत  प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार अर्ज केला आहे.त्यामुळे वरीष्ठ काय कारवाई करतील हे पाहाने औस्तुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा