Subscribe Us

header ads

बिलकिसबानो प्रकरणी मोदी-भाजपाच्या विरोधात लोकसेना चले जाव आंदोलन करणार-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


बिलकिसबानो प्रकरणी मोदी-भाजपाच्या विरोधात लोकसेना चले जाव आंदोलन करणार-- ॲड. प्रा. इलियास इनामदार



बीड प्रतिनिधि: गुजरात दंगलीत गरोदार बिलकिसबानो गँग रेप व तीन वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपी अाजन्म शिक्षा भोगत असताना व देश स्वतंत्रतेचा  पंच्यात्तरवा स्वर्ण महोत्सव साजरा करत असताना गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाने वरील अकरा आरोपींची शिक्षा माफ करुन त्यांना बरी करुन टाकले हा निर्णय  माणूसकीला काळीमा फासणारा असून या निर्णयाचा लोकसेना संघटना जाहिर निषेध करत आहे व देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, कायदामंत्री, अल्पसंख्याक कार्यमंत्री, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग व मुख्यमंत्री गुजरात सरकार यांना बीड जिल्हाधिकारी मार्फ़त लोकसेना संघटनेने,  लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्तासह वरील आरोपींना दिलेली माफी निर्णय रद्द करावा या आशयाचे निवेदन दिले आहे.सोबत लोकसेना संघटना सर्व नागरिकांना आव्हान करत आहे की येणाऱ्या शुक्रवारी प्रत्येक नागरिकाने देशात आता पर्यंत झालेल्या बलात्काराच्या तमाम घटनाच्या विरोधात आपापल्या घरावर काळे झेन्डे लावून निषेध नोंदवावा व दिल्ली मधील निर्भया बलात्कार व हत्या प्रकरण असो की हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरण असो देशातील तमाम जनता जशी रस्त्यावर उतरली व या आरोपींना शिक्षा होण्यापर्यंत शांत बसली नाही सरकारला सळाे की पळाे करुन सोडणाऱ्या जनतेने बिलकिसबानो बलात्कारातील आरोपीँची शिक्षा माफ करु नये त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्यात यावी यासाठी रस्त्यावर उतरावे जेणे करुन देशातील जनतेचा विश्वास संविधान, लोकशाही व न्यायपालिका बद्दल कायम राहीन नसता प्रत्येक जन जात धर्म बघून न्याय मागण्यासाठी आंदोलन करतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात महिलांचा आदर करा सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी साहेब काहीच बोलत नाही. राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी  याप्रकरणाची गंभीर दखल घेवून आरोपीँची माफ झालेली शिक्षा रद्द करण्याचे निर्देश गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाला द्यावे नसता लोकसेना संघटना एक सप्टेम्बर पासून मोदी-भाजपा चले जाव आंदोलन सुरु करणार अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार, जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, मिर्ज़ा खैसर बेग, प्रा. संजय खांडेकर, अतीख अहमद खान, ॲड. कलीम काज़ी, शेख अयाज़ अखतर, अकबर अतार नदीम मेंबर, शेख साबेर व लोकसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आव्हानाद्वारे केली आहे.

                                
                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा