Subscribe Us

header ads

खोकरमोह येथील विकास कामांचा आ.क्षीरसागरांनी केला 'श्री गणेशा'

बीड स्पीड न्यूज 



खोकरमोह येथील विकास कामांचा आ.क्षीरसागरांनी केला 'श्री गणेशा' लवकरच होणार 'वाड्यांमधील'ही विकास कामांना सुरुवात

बीड (प्रतिनिधी):- शिरूर (का.) तालुक्यातील खोकरमोह येथील श्री संत वामनभाऊ व श्री संत भगवान बाबा मंदीरासाठी संरक्षण भिंत बांधणे तसेच व्यायामशाळा उभारणे आदी एकुण ५० लक्ष रूपयांच्या कामांचा बुधवार (दि.३१) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी श्री गणेशा अर्थात शुभारंभ केला व परिसरातील बरगवाडी, घुगेवाडी लगतच्या सर्व गावांना जोडणार्‍या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.बीड मतदारसंघातील खोकरमोह येथे श्री संत वामनभाऊ व श्री भगवान बाबा> 

मंदीराचे बांधकाम सुरू आहे. या मंदिरास संरक्षण भिंत बांधणेसाठी गावकर्‍यांनी मागणी केली होती. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून ३० लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद केली व बुधवार (दि.३१) रोजी या कामाचा शुभारंभ केला तसेच गावात व्यायामशाळा उभारण्यात यावी अशी मागणीही तरूणांनी यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे केली त्यामुळे आपल्या स्वनिधीतून आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यायाम शाळेसाठी २० लक्ष रूपयांचा निधी दिला व लगेच याही कामाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान खोकरमोह, 

बरगवाडी, घुगेवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा कामालाही तांत्रिक मान्यता मिळाली असून याचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. या कार्यक्रमास आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सुनील धांडे सर, माजी आ.सय्यद सलीम सर, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे नेते वैजनाथ तांदळे, बरगवाडी, घुगेवाडी ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच खोकरमोह येथील सरपंच, उपसरपंच, मदनराव जाधव, माऊली सानप, हांगे दादा, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा