Subscribe Us

header ads

राजुरी येथील हरिनाम सप्ताहास आ.क्षीरसागरांनी दिली भेट किर्तन व महाभिषेकास उपस्थिती

बीड स्पीड न्यूज 



राजुरी येथील हरिनाम सप्ताहास आ.क्षीरसागरांनी दिली भेट किर्तन व महाभिषेकास उपस्थिती

बीड (प्रतिनिधी)‌ :- तालुक्यातील नवगण राजुरी येथे गणेशोत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवार (दि.३०) व बुधवार (दि.३१) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली व ह.भ.प. विनोदाचार्य आक्रुर महाराज साखरे यांच्या किर्तन कार्यक्रम व महाभिषेक सोहळ्यास उपस्थिती दर्शविली.दरवर्षी प्रमाणे नवगण राजुरी येथे गणेशोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.या सप्ताहाला सोमवार (दि.२९) रोजी सुरूवात झाली असून 

आ.संदीप क्षीरसागर, सलग दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी किर्तन व महाभिषेक कार्यक्रमास उपस्थित राहिले. मंगळवार (दि.३०) रोजी विनोदाचार्य ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे यांच्या किर्तन कार्यक्रमाला उपस्थित राहून किर्तन श्रवण केले व ह.भ.प. आक्रुर महाराज साखरे यांचा आ.संदीप क्षीरसागर यांनी सत्कार केला. तसेच बुधवार (दि.३१) रोजी सकाळी शहागड येथून आलेली कावड यात्रा राजुरी गावामध्ये दाखल झाली व आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. आ.संदीप क्षीरसागर श्री मंगलमुर्ती  देवस्थानच्या महाभिषेक कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी गावातील नागरिक तसेच परिसरातील भाविक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा