Subscribe Us

header ads

बीड पोलिसांची मोठी कारवाई; लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बीड स्पीड न्यूज 


बीड पोलिसांची मोठी कारवाई; लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


बीड | प्रतिनिधी -: बीड जिल्ह्यात चोरीच्या घटनेचे प्रमाण खूप वाढले आहे चोरट्यांच्या विरोधात पोलीस कारवाया चालूच आहेत. भर दिवसा लुटमार करण्याऱ्या टोळीचा पोलिसांनी आज पर्दाफाश केला आहे गेवराई परिसरात एका बँक कर्मचाऱ्याला गाडी आडवी लाऊन लुटल्याचा प्रकार घडला होता. या घटनेतील तीन जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की २६ ऑगस्ट रोजी आयडीएफसी बँकेचे कर्मचारी सुदर्शन शिवाजी आघाव हे पाचेगाव येथून महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाचे हप्ते जमा करून गेवराई कडे जात होते त्याचवेळी सर्विस रोडवर असताना पाठीमागून एका पल्सर गाडीवर दोघे आले दोघांनी सुदर्शन आघव यांना चाकूचा धाक दाखवत जवळील ९५  हजार ६१०  रुपये असलेली  बॅग घेऊन दोघे पसार झाले होते.या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलीस चोरट्याचा शोध घेत होते आणि ४ दिवसात बीड च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी आनंद सुंदर ससाने रा. पंचशील नगर बीड. आकाश प्रकाश धुताडमल रा. टाकळगाव ता. गेवराई .आणि अखिल इस्माईल शेख रा आहेर वाहेगाव या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे दरम्यान या टोळीला पकडल्याने बीड जिल्ह्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा