Subscribe Us

header ads

मिल्लीया महाविद्यालयात आज़ादी की अमृत कहानियां या विषयावर व्याख्यान संपन्न


बीड स्पीड न्यूज 


मिल्लीया महाविद्यालयात आज़ादी की अमृत कहानियां या विषयावर व्याख्यान संपन्न

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी इतिहास विभागाच्या वतीने आज़ादी का अमृतमहोत्सवा निमित्ताने आज़ादी की अमृत कहानियां या विषयावर प्राध्यापक डॉक्टर गणपत गट्टी इतिहास विभाग प्रमुख,श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, शिरसाळा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस, इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर शेख कलीम, पदव्युत्तर संचालक प्रा. फरीद अहमद नेहरी, डॉ. शेख हुसेन यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉ. गणपत गट्टी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विविध नेत्यांच्या योगदान यावर उत्तम प्रकाश टाकला तसेच स्वातंत्र्यलढ्यात बेगम हजरत महल, आजीझन  व इतर मुस्लिम महिलांच्या योगदानाची माहिती दिली. इतिहास विभाग प्रमुख डॉ.शेख कलीम मोहिउद्दिन यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अश्फाक उल्ला खान, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम उलेमांचे योगदान देखील फार महत्त्वाचे होते त्यांनी 1919 मध्ये जमियात उलमा ई हिंद या संघटनेची स्थापना करून स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले तसेच मौलाना महमूद हसन व मौलाना  उबेद उल्ला सिंधी यांनी रेशमी रुमाल चळवळीच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला या चळवळीत मौलाना हुसेन मदनी यांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सय्यद  शौकतउल्ला हुसैनी यांनी  विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अभ्यास करावा असे सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृद, उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा