Subscribe Us

header ads

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड स्पीड न्यूज 


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 

बीड|प्रतिनिधी  दि. 13, -: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित सायकल, मोटारसायकल रॅली व एकता दौडला बीडवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस 

अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे आदिंसह विविध विभागांचे  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला.हुतात्मा स्मारक, नगर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका ते कपिलधार असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व 

अधिकारी, मान्यवर व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, सायकलिंग आरोग्यासाठी चांगले असून प्रत्येकाने ते केले पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित या रॅलीत सहभागी प्रत्येक बीडवासियाचे मी मनापासून अभिनंदन करतो. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी स्पर्धकांमुळेच आपणही उत्साहाने ही सायकल रॅली पूर्ण करू शकलो. यापुढे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या आरोग्याच्या व विकासाच्या दृष्टीने सांघिक प्रयत्न करु, असे सांगून त्यांनी हर घर तिरंगा उपक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात 

आली.रॅलीमध्ये बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, बीडचे तहसीलदार सुहास हजारे, तहसीलदार संतोष बनकर, प्रकल्प संचालक, आत्मा एस. एम. साळवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि. प. शिवप्रसाद जटाळे, बीड रोटरी क्लब अध्यक्ष कल्याण 

कुलकर्णी, योगा गृप बीडचे डॉ. अनिल थोरात, डॉ. सचिन रेवणवार, बाळासाहेब माने, संतोष भोकरे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय हंगे यांच्यासह सर्व महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच डॉक्टर, इंजिनिअर, यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा