Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश,बलभीम नगर ते नाळवंडी नाका रोडची तात्काळ दुरुस्ती -पुरुषोत्तम वीर

बीड स्पीड न्यूज 


वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश,बलभीम नगर ते नाळवंडी नाका रोडची तात्काळ दुरुस्ती -पुरुषोत्तम वीर 

बीड प्रतिनिधी / दि.13 बीड शहरातील बलभीम नगर ते नाळवंडी रोड वर अंडरग्राउंड पाईपलाईन नवीन रोड निर्मितीसाठी खोदकाम कामामुळे खड्डे पडले होते अर्धा पावसाळा असाच निघून गेला यामुळे या भागातील नागरिकांना नाहक प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते हा विषय या ठिकाणच्या लोकांच्या जिव्हाळ्याचा होता वेळोवेळी निवेदने धरणे रोड रोको व  सांगूनही नगरपालिका प्रशासन कोणाच्या तरी सांगण्यावरून मुद्दाम हे काम करत नव्हते येणे  वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते पुरुषोत्तम वीर वंचित बहूजन आघाडी च्या पूढाकारातून बलभिम नगर,गजानन नगर,एकता नगर इस्लामपूरा या भागाला जोडणारा मध्यभागी असलेला रस्ता इदगाह ते नाळवंडी चौक या भागातील ठीक ठीकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचे काम वेगात सुरु या प्रसंगी उपस्थित वंचित बहूजन आघाडी चे नेते पुरुषोत्तम (गोटू )वीर,ज्ञानेश्वर गूंजाळ,सुशिलआप्पा कावडे,सिद्धांत (भैय्या)काकडे, संतोष भोसले,लक्ष्मण गव्हाणे, इजि.विपूल मस्के भैय्यासाहेब वाघमारे,नितीन 

वाघमारे,दिपक ससाणे,राजू काकडे,व असंख्य कार्येकर्ते उपस्थित यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी , ढाकणे यांची भेट घेऊन या भागातील रस्त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे कामाला सुरुवात केली याचा सातत्याने पाठपुरावा पेठ बीड येथील पदाधिकारी कार्यकर्ते सोबत होते त्यांनी स्वतः उभारून या ठिकाणचे रस्ते खड्डे भरून घेतले व या कामी पुढाकार घेतला आज त्याचा दुसरा दिवस आहे यामुळे या भागातील नागरिकांनी बहूजन आघाडी आभार मानले आहेत त्यामध्ये बलभिम नगर,गजानन नगर,एकता नगर इस्लामपूरा या भागातील नागरिक उपस्थित होते मध्यभागी असलेला रस्ता इदगाह ते नाळवंडी चौक या भागातील ठीक ठीकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचे काम वेगात सुरु या प्रसंगी उपस्थित नेते होते त्यांचे आभार नागरिकांतून मानले जात आहेत.


वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश,


वंचित बहुजन आघाडीने सातत्याने अशा वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे बीड शहरातील कुठल्याही प्रभागात जर रोडच्या नालीच्या पाण्याच्या स्वच्छतेच्या समस्या असतील तर निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे त्यासाठी समस्याग्रस्त प्रभागातील नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे संपर्क क्रमांक पुरुषोत्तम वीर 79 72 75 65 06

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा