Subscribe Us

header ads

ब्रेकिंग न्यूज: आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

बीड स्पीड न्यूज 

ब्रेकिंग न्यूज:  आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन


बीड -: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्यामध्ये
आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात माजी आमदार तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे (वय ५२) यांचे निधन झाले.विनायक मेटे यांची आज बीडमध्ये मोठी बाईक रॅली होती. मात्र, काही कामानिमित्त त्यांनी बाईक रॅली रद्द केली आणि मुंबईकडे निघाले होते. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्यामध्ये त्यांच्या गाडीला दहा चाकी ट्रकने धडक दिली. या अपघातात मेटे यांच्या गाडीची डावी बाजू चेपली गेली. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाली. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. अपघातात मेटे यांचा •बॉडीगार्ड आणि गाडी चालकही गंभीर जखमी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा