Subscribe Us

header ads

अन्न आणी औषध प्रशासन अधिकारी साहेब बाजारातील मिठाई, दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करावी - बाळासाहेब धुरंधरे

बीड स्पीड न्यूज 

अन्न आणी औषध प्रशासन अधिकारी साहेब बाजारातील मिठाई, दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करावी - बाळासाहेब धुरंधरे

प्रामुख्याने किराणा दुकानांमध्ये मिळणारे लहान मुलांचे खाद्य पदार्थ वेळोवेळी आठवड्याला तपासावेत सर्व चित्र समोर येईल.

बीड प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र वर्षातील मोठ्या सणा सुदिचे दिवस तोंडावर आले आहेत. काही आठवड्यातच गणपती बसणार आहेत तर गौरी लक्ष्मी ही बसतात या सणासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गोड- धोड मिठाई, विवीध दुग्धजन्य पदार्थ, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात अशातच काही मुबलक ठिकाणी बाजारात मोठ्या प्रमाणात केमीकल युक्त खवा, रंगबेरंगी मिठाईत मिसळला जाणारा कलर ज्या पदार्थांत मध्ये मिसळला जातो हा तपासावा. याने माणवी जिवाला मोठी हाणी होण्याची शक्यता आहे. अशाच भेसळयुक्त पदार्थ पोटात गेल्यानंतर मानसाला पोटदुखी, मळमळ, तर कॅन्सर सारखा महा भयंकर होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे बीड जिल्ह्यातील तसेच शहरातील अनेक ठिकाणी अन्न औषध विभागाने वेळीच धाडी टाकाव्यात व बीड शहरातील भैसळयुक्त दुध पाकिटे बनवणारे, भेसळयुक्त खवा, भेसळयुक्त चहा, अनेक हाॅटेल मध्ये अती चवीच्या भाज्या लागाव्या म्हणून वापरल्या जाणाऱ्या चविसाठी वापरली जाणारी टेस्टींग पावडर, महत्वाचे चहा पिण्याचे  प्लास्टिक ग्लास हा तर शरीरासाठी खुपचं घातक आहे या वरती योग्य कारवाई होणे गरजेचे. तसेच छोट्या मोठ्या किराणा दुकानांवर लहान मुलांचे खाद्य पदार्थ, यांचेही काही लोकल खाद्यपदार्थ तपासावेत कारण लहान मुलांना खाण्यासाठी दुकानात मिळणारे पदार्थाची चव लागावी म्हणुन खुपचं जास्त प्रमाणात काही पाकीटातील पदार्थ फारच चवीचे बनवलेले असतात. या चवी मागे काही भेसळ तर नाही ना? असा मुख्य प्रशन निर्माण झाला आहे. अशा भेसळीची पदार्थ खाऊन लहान मुलांना मळमळीची समस्या बीड शहरात अनेक भागात बऱ्याच प्रमाणात समोर आल्या आहेत. या पासुन लहान मुलांना कॅन्सर सारखा भयंकर आजार होण्याची शक्यता असते. त्यात प्रामुख्याने या पदार्थांचे नमुने अन्न औषध प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी आठवड्यातून एकदा तपासणीसाठी घेतले तर बरेच राहील. तेव्हाच कुठे बाजारात भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणलेले दिसतील तसेच बाजारात केमीकल युक्त मुक्त पदार्थ मिळायला लागतील व लोक या पदार्थाला शंकेने न खरीदी करता मनसोक्त खरेदी करु शकतात.असे रुग्ण मित्र फांऊडेशन अध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे यांनी वेळोवेळी बातमी व्दारे प्रशासनाच्या नजरेत आणुन दिले आहे. व लवकरच आपण अन्न आणी औषध प्रशासनाला निवेदन देणार आहोत असे प्रसार माध्यमांद्वारे कळवले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा