Subscribe Us

header ads

अंगणवाडीतील पोषण आहारामध्ये किडे; बालगोपालांच्या आरोग्याशी खेळ

बीड स्पीड न्यूज 


अंगणवाडीतील पोषण आहारामध्ये किडे; बालगोपालांच्या आरोग्याशी खेळ

प्रहारचे हनुमंत तोंडे यांचे बीड जिल्हा परिषद मुख्यधिकारी यांना निवेदन

किल्लेधारूर / प्रतिनीधी-: धारूर पंचायत समिती अंतर्गंत तालुक्यातीलअंगणवाडी विभागातील पोषण आहार समन्धीत विभागातील अधिकाऱ्यांचा निष्काळीपणा करत आहे अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खेळ सुरू आहे.धारूर तालुक्यातील अंगणवाडीतील बाल गोपालांच्या आरोग्या सोबत संबंधित विभागाने खेळ मांडला आहे पंचायत समितीचे कदम यांनी तालुक्यात अंगणवाड्यांना शालेय पोषण आहार वाटप करताना त्यांची जबाबदारी योग्यरीत्या न पार पडल्याने संपूर्ण तालुक्यात पूर्ण निकृष्ट दर्जाचे हरभरा त्यात किडे देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळ करतआरोग्यावर 

दुष्परिणाम होऊ शकतात अंगणवाड्यामध्ये तेच हरभरा शिजवून त्यात किडे असताना अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना तोच आहार शिजवून खायाला दिला जातो यामुळे तालुक्यातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत.धारूर तालुक्यात पंचायत समिती विभागामार्फत अंगणवाडी विभाग या विभागाचे कदम साहेब यांच्या निगराणी खाली तालुक्यातील अंगणवाडीमध्ये शालेय पोषण आहार खाऊचे वाटप केले जाते.मात्र यामध्ये तालुक्यात अनेक ठिकाणी अंगणवाडीतील बालगोपालांच्या खाऊ मध्ये चक्क किडे शिजवून त्या विद्यार्थ्यांना खाऊ घालण्याचा प्रकार होत आहे यामुळे या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे.तालुक्यातील विविध अंगणवाडीमध्ये बीड जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती व पंचायत समितीमध्ये असलेला अंगणवाडी विभागातून कदम यांच्या निगराणी खाली धारूर  तालुक्यात शालेय पोषण आहार व इतर खाऊचे वाटप केले जाते यामध्ये शासनामार्फत कॉन्ट्रॅक्ट दिलेले असले तरी समन्धीत कॉन्ट्रॅक्टर सोबत हात मिळवणी करून तालुक्यात निकृष्ट दर्जाचं पोषण आहार देऊन यातून चांगल्या पद्धतीचा आहार न देता कमी किमतीचा येणारा आहार तालुक्यात अंगणवाड्यांना 

वाटप करणे यामध्ये किडे असो की इतर घाण याची तपासणी न करणे यामुळे बाल गोपालांच्या आरोग्याशी खेळ करण्याचे कारस्थान संबंधित अधिकारी व कंत्रालदाराकडून केले जात आहे खाऊचे वाटप केलेल्या शालेय पोषण आहार मधील तालुक्यातील  गावामध्ये हरभरा या शिजवलेल्या कडधान्यावर यांचा खच दिसून आला आहे तोच आहार शिजवून नंतर त्यामध्ये हरभऱ्यातील घुगऱ्यावर मृत किडे दिसत आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या बालगोपालांच्या आरोग्याशी खेळ हे तालुक्याचे अधिकारी करत असून संबंधितावर कारवाई करावे अशी मागणी या तक्रार अर्ज वरून हनुमंत तोंडे यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे.
निगर घट्ट झालेल्या या संबंधित शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारावर व या वर दुर्लक्ष करणार्या श्री विलास कदम यांच्या वर आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी अशी माहीती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे यांनी मुख्यधिकारी (सिओ)यांना एका मेल द्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा