Subscribe Us

header ads

आरोग्य सेवेच्या माध्यमातुन समाजसेवा करण्याची डॉक्टरांना संधी-आ.धनंजय मुंडे

बीड स्पीड न्यूज 

आरोग्य सेवेच्या माध्यमातुन समाजसेवा करण्याची डॉक्टरांना संधी-आ.धनंजय मुंडे

परळी येथील संजीवनी बाल रुग्णलयाचे उद्घाटन

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातुन सामाजीक कार्य करता येते.आरोग्य सेवेच्या माध्यमातुन केलेले सामाजीक कार्य सर्वश्रेष्ठ असुन संजीवनी रुग्णालयाच्या माध्यमातुन ही जनसेवा घडेल.अत्याधुनिक सुविधा असलेल्या या रुग्णालयामुळे परळी शहर व परिसरात रुग्णांची मोठी अडचण दुर झाली असल्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी सांगितले.परळी शहरात नव्याने सुरु झालेल्या संजीवनी बाल रुग्णलयाचे उद्घाटन आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवार दि.21 ऑगस्ट रोजी करण्यात आले.   
या उदघाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून न.प.गट नेते वाल्मिक अण्णा कराड, माजी मंत्री पंडितराव दौड, उपसचिव मंत्रालय मुंबईचे नारायण कराड, जि.प.गट नेते अजय मुंडे, राष्ट्रवादी यु.कॉ. प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, परभणी जि.प. सदस्य राजेश फड, परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे, परळी मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर घुगे, प.स.परळी 

सभापती बालाजी  मुंडे, मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे, परळी मेडिकल असोचे सचिव डॉ.सतीश गुठ्ठे,बालरोग तज्ञ डॉ.सूर्यकांत मुंढे, इंडियन मेडिकल असो-चे अध्यक्ष डॉ.अजित केंद्रे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकभाऊ फड, अभ्यागत मंडळ सदस्य डॉ.मधुसूदन काळे, इंडियन मेडिकल असो-चे उपाध्यक्ष डॉ.विजय रांदड, भाजपा जेष्ठ नेते बंकटराव कांदे, भाजपा युवा नेते राजेश गित्ते, परळी मेडिकल असो.चे उपाध्यक्ष डॉ.अमोल चाटे, सचिन तिडके, मदन मुंडे गोपाळ कंकाळ, गजानन मनाळे यांनी अण्णांचा सत्कार केला व सर्व सन्माननीय सदस्य परळी मेडिकल व इंडियन मेडिकल असो. यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत  डॉ.स्वप्ना संभाजी मुंडे,डॉ.व्यंकटेश पंडितराव तिडके, डॉ.सचिन सूर्यकांत निळे, डॉ.दिलीप गायकवाड,अशोक पंडितराव तिडके,सूर्यकांत रामचंद्र निळे यांनी केले.यावेळी रुग्णालयास शुभेच्छा देण्यासाठी परळी व परिसरातील सर्व क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा