Subscribe Us

header ads

इंदुरीकर महारांजाविरोधात गावकरी आक्रमक; तक्रार करण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात घेतली धाव

बीड स्पीड न्यूज 


इंदुरीकर महारांजाविरोधात गावकरी आक्रमक;  तक्रार करण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात घेतली धाव

बीड | किर्तनकार निवृती महाराज इंदुरीकर हे त्यांच्या किर्तनामुळे आणि विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यातील कळंबकर गावात इंदुरीकर महारांजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ते किर्तनासाठी त्या गावात वेळेवर पोहोचले नाहीत. त्यामुळे गावकरी संतापले.गावकरी इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार करण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात पोहोचले. महारांजानी त्यांना किर्तनाची तारीख दिली होती. पण त्यांनी वेळ पाळली नाही, असे ते म्हणाले.आम्ही ते येणार म्हणून गावभर जाहीरात केली. रिक्षावर भोंगा लावून आम्ही गावाला कळविले. पण ऐनवेळी त्यांनी असा घोळ घातला. म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावे लागले, असे गावकरी म्हणाले.इंदुरीकरांच्या या कार्यक्रमासाठी गावाकऱ्यांनी वर्गणीतून एक ते दीड लाख रुपये खर्च केला. पण ऐनवेळी महाराजांनी किर्तनाला येणार नाही असे  कळविल्याने, त्यांनी आमची फसवणूक केली, असे गावकरी म्हणाले.इंदुरीकर महाराज कळंबकर गावी न जाता दुसऱ्या गावी किर्तनाला गेले अशी अफवा पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतापले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा