Subscribe Us

header ads

संस्कार भारती बीडची कृष्णसवंगडी वेशभुषा स्पर्धेस उंदड प्रतिसाद ८१ बालदोस्तांनी घेतला सहभाग

बीड स्पीड न्यूज 


संस्कार भारती बीडची कृष्णसवंगडी वेशभुषा स्पर्धेस उंदड प्रतिसाद ८१ बालदोस्तांनी घेतला सहभाग


प्रतिनिधी | बीड-: कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने संस्कार भारती बीड च्या वतीने कृष्ण सवंगडी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या या  स्पर्धेस ८१  छोट्या बालदोस्तांनी  स्पर्धेत सहभाग नोंदवला गोकुळाष्टमीचे औचित्य साधून बीड येथील  संस्कार भारतीच्या वतीने प्रत्येक वर्षी कृष्ण रूप सज्जाचे आयोजन करण्यात येते. यंदा कृष्णाच्या सवंगड्यांना सुद्धा यात सहभाग घेता यावा, म्हणून स्पर्धेचे थोडेसे स्वरूप बदलून श्री श्री रविशंकर विद्या मंदिराच्या प्रांगणात  कृष्ण सवंगडी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. दोन गटात घेतलेत्या या स्पर्धेत छोट्या गटात प्रथम  यशश्री तळेकर तर व्दितीय   श्रेयांश राक्षसभुवनकर, तृतीय   ईशान्वी गुळजकर  तर उत्तेजनार्थ ॠत्वी चव्हाण तर मोठ्या गटात प्रथम राजनंदनी मगर, व्दितीय  शिवांजली सुरवसे , तृतीय स्वराली तांबारे  अशी पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे दोन्ही गटातील प्रथम पारितोषक  एक हजार रूपये  गौरव लिंमगावकर पुणे,  सातशे रूपयांचे  व्दित्तीय पारीतोषक   स्व. मीना दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ डी एस कुलकर्णी यांनी तर पाचशे रूपयांचे  तिसरे पारितोषक   नामदेव साळुंके यांच्या  बीड येथील स्वरांग संगीत विद्यालयाने दिले.संस्कार भारतीचे प्रांताध्यक्ष भरत लोळगे, जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे,शहराध्यक्ष स्नेहा पारगावकर,संतोष पारगावकर,अनिल कुलकर्णी,गुरु कुलकर्णी,महेश देशमुख, रेणुका डांगे यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरेश साळुंके व अश्विनी बडे यांनी काम पाहिले. सुत्रसंचलन गणेश तालखेडकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्कार भारती बीडचे कार्यकर्ते व श्री श्री रविशंकर विद्या मंदिरच्या सर्व शिक्षकवृदांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा