Subscribe Us

header ads

अल्ताफ शेख दिग्दर्शित हिंदी चित्रपट धारावी कट्टा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


अल्ताफ शेख दिग्दर्शित हिंदी चित्रपट धारावी कट्टा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे (प्रतिनिधी) - हिंदी चित्रपट "धारावी कट्टा" या चित्रपटाची पहिली अचीवमेंट खडकी येथे मोठ्या थाटात संपन्न झाली. दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदिरा कल्याण केंद्र खडकी च्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल युध्दातील शूर सैनिक कमांडो जगदिश चंद्रा देसले आणि आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमात खडकी छावणी परिषदेचे उपाध्षक्ष दुर्योधन भापकर तसेच माजी उपाध्यक्ष मनिष आनंद त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये अजीज़ नवाज़ शेख, माजी नगरसेवक तुषार गांधी, धर्मेश शहा, रामजी कुमार (सी.बी.आय.अधिकारी), राज खतिब (ए.सी.पी. मुंबई), डी.ओ.पी. कुमार डोंगरे, अभिनेता महादेव शिरोडकर, बाळासाहेब आहेर, सालाबादप्रमाणे हाजी हुसेन कुरेशी यांचे विशेष योगदान मिळाले.या कार्यक्रमात वर्ल्ड बुक रेकाँर्ड आणि राष्ट्रीय  पुरस्कार विजेते अल्ताफ़ दादासाहेब शेख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या हिंदी चित्रपट धारावी कट्टा चे प्रमोशन करण्यात आले. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी चित्रपटातील प्लेबॅक सिंगर अर्पित कोमल,  अभिनेत्री मुस्कान शेख, अभिनेता अभिषेक चवरे, खलनायक नबी शेख, अली शेख, अमजद खान, शेख सलमान, शेख आणि किरण घोडके, आरती पाटील, स्वरूप वेदक, कोरियोग्राफर रियाज़ शेख, कॉस्च्युम डिझायनर संगीता चवरे, मेकअप शैला पाटील, लाईन प्रोडूसर शहाजहान शेख, अफजल इस्माईल खान, (संपादक पोलीस रक्षक न्यूज), पत्रकार कलिंदर शेख, आफताब कलिंदर शेख (निर्भिड पत्रकार न्यूज), इंदिरा कल्याण केंद्राचे अध्यक्ष हाजी समीर चौधरी, अजहर खान, हारून सय्यद, जफ़र चौधरी, महेबुब पिरज़ादे, शहानवाज़ कुरेशी, फिरोज़ शेख, ज़हीर शेख , असिफ पिरज़ादे, जूनैद चौधरी, सईद शेख, अयाज़ कुरेशी, रिज़वान शेख, युसूफ़ शेख, सोहेल कुरेशी, ज़ाकीर शेख, मगदुम खान, मूर्तुझा शेख, विजय गायकवाड, फिरोज खान, रवि गायकवाड, अनिल सोनवणे, गणेश कांबळे, अनिल जाधव, महेबूब शेख, मुख़्तार कुरेशी, सलिम कुरेशी, जादुगार शामकुमार आणि रमज़ान ज्युनिअर अमिताभ बच्चन इत्यादि सर्वं कलाकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा