Subscribe Us

header ads

चार वर्षीय चिमुरडीचा तलावात बुडून मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


 चार वर्षीय चिमुरडीचा तलावात बुडून मृत्यू


परळी | दि. 25  सकाळच्या सुमारास परळी गंगाखेड रस्त्यावरील औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक तळे  असल्याने या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. पवार कुटुंबातील तीन भावंड खेळत खेळत राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. त्याठिकाणी मयत साक्षी व तिची दुसरी बहीण या पाण्याच्या डबक्यात खेळू लागले. खेळता खेळता ते पाण्यात पडले याच ठिकाणी असलेलला त्यांचा  सात वर्षाचा मोठा भाऊ याने ती घटना पहिली आणि धावत जाऊन त्याने आपल्या पालकांना सांगितले. साक्षी चे वडील घटनास्थळावरून येऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत चार वर्षाची साक्षी या चिमुरडीचा मृत्यू झाला. एका मुलीला सुखरुप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपच्या मागे पवार कुटुंबांचे घर आहे. राखेच्या तळ्या पासून 100  मीटर अंतरावरच त्यांचे घर आहे.सकाळच्या सुमारास हे मुले खेळत खेळत या तळ्यात गेली होती. खेळताना दुर्देवाने या तीन मुलांमधील चार वर्षाची चिमुरडी साक्षी साईनाथ पवार हिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा