Subscribe Us

header ads

निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडून दैनिकाच्या पत्रकाराला अपमानस्पद वागणुक !

बीड स्पीड न्यूज 

निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडून दैनिकाच्या पत्रकाराला अपमानस्पद वागणुक !

बीड/प्रतिनिधी -: काल बिलकीस बानो प्रकरणी महिलांकडून आंदोलन करण्यात आले होते आणि आंदोलन करून निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांची फोटो काढताना पत्रकाराला अपमानस्पद वागणुक देऊन कॅबीनच्या बाहेर हाकलुन दिले  असे निवेदन जिल्हाधिकारी यांना पत्रकारांकडुन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,काल दिनांक 24/08/2022 बुधवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने निदर्शने झाल्या नंतर काही महिला पदाधिकारी निवेदन देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या कॅबीन मध्ये जात असताना शिष्ट मंडळा सोबत पत्रकार शेख तालेब सुध्दा संतोष राऊत यांच्या कॅबीन मध्ये गेलो शिष्ट मंडळाकडुन निवेदन देत असतांना कॅबीन च्या खिडकीच्या उजेडामुळे फोटो व्यवस्थीत येत नव्हाता त्यामुळे पत्रकार शेख तालेब यांनी महिला पदाधिकारी यांना थोडी खिडकी सोडुन निवेदन द्या फोटो व्यवस्थीत येत नाहीत . असे म्हणाले त्या क्षणी संतोष राऊत यांनी शेख तालेब यांना तु अगोदर माझ्या कॅबीनच्या बाहेर हो चल निघतोस का नाही बाहेर असे म्हणुन पत्रकार शेख तालेब यांचा कृती समितीच्या शिष्टमंडळा समोर अपमान केला . आणि  कॅबीनच्या बाहेर हाकलुन दिले . काही कारण नसतांना या घटनेमुळे पत्रकार शेख तालेब यांचा  अपमान झाला असुन एका लोकप्रिय दैनिकाच्या पत्रकाराला जर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत अशी वागणुक देत असतील तर सामान्य नागरीकांना कशी वागणुक देत असतील हा प्रश्न निर्माण होतो.घटनेमुळे पत्रकार शेख तालेब फार डिप्रेशन मध्ये गेलो असुन जिल्हाधिकारी साहेबांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत  यांच्यावर त्वरीत कार्यवाही करवी नसता जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव लोकशाही मार्गाने अदोलन करतील असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी मोहम्मद अबुबकर,शेख कामरान,भागवत वैद्य,सय्यद इरफान,ईमरान फारोखी,सुनिल डोंगरे,विक्रांत वीर,सय्यद फेरोज अली,रफीक सय्यद, अरूण खेमाडे आदी पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा