Subscribe Us

header ads

बापूजी नगर, धानोरा रोड परिसरात विकास कामे पूर्ण करणार --डॉ. योगेश क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 


बापूजी नगर, धानोरा रोड परिसरात विकास कामे पूर्ण करणार --डॉ. योगेश क्षीरसागर

नगरसेवक रंजीत बनसोडे,  भैय्यासाहेब मोरे विकास कामासाठी यशस्वी पाठपुरावा करणार...
 

बीड | प्रतिनिधी दि. ०७ -: बापुजी नगर भागातील जिनिअस इंग्लिश स्कुल येथे पार पडलेल्या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक संपन्न झाली.बैठकी प्रसंगी रस्त्या संदर्भात व इतर आवश्यक समस्या बाबत मा.नगरसेवक रंजीत  बनसोडे, भैय्यासाहेब मोरे यांनी नागरिकांच्या व्यथा उपस्थित केल्या. पुढील 

काळात हा रस्ता व नाल्यांच्या प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात  डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर यांना विनंती केली. या भागातील शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना, पालकांना व येथील वृद्ध रहिवाश्यांना प्रचंड त्रास होत असल्याचे सांगितले. सर्व नागरिकांनी रस्त्या बाबत प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात  मागणी केली. सर्व नागरिकांच्या वतीने 

ऍड. दिपक तांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करत विकास कामा संदर्भातील आजची गरज, वारंवार होणारी अडचण असे अनेक मुद्दे उपस्थित केले. सुत्र संचलन श्री खाडे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. येत्या काळात रस्ता, नाल्या व इतर विकास कामे पूर्ण मार्गी लावण्या संदर्भात डॉ. योगेश भैय्यांनी नागरिकांना ग्वाही दिली तसेच मा. 

नगरसेवकांच्या कार्यबद्द्ल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जिनिअस इंग्लिश स्कुलच्या पालकांच्या वतीने डॉ. प्रशांत देशपांडे यांनी व्यथा मांडत लवकरच रस्ता पूर्ण करून दिला जाईल असे आश्वासनही मान्यवरां कडून घेतले. ऍड. चंदनशिव व इतर नागरिकांनी सविस्तरपणे निवेदनही दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा