Subscribe Us

header ads

माजलगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे डोकं जागेवर आहे का? बॅनरवर हंगेरियन देशाचा झेंडा टाकला, गुन्हे दाखल करा-- शेख रशिद

बीड स्पीड न्यूज 


माजलगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे डोकं जागेवर आहे का? बॅनरवर हंगेरियन देशाचा झेंडा टाकला, गुन्हे दाखल करा-- शेख रशिद

माजलगाव|प्रतिनिधी-: काहिना काहि कारणांमुळे चर्चेत असलेली माजलगाव नगरपरिषदेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त पुर्ण शहरात बॅनर टाकले होते. पण हया बॅनरात हंगेरियन देशाचा झेंडा टाकला आहे भारत देशाचा तिरंगा नप च्या अधिकारी,कर्मचारी माहित नाही हि अती दुःखीची बाब आहे. हया बॅनर मध्ये अशोक चक्र कुठेच दिसत नाही.तिरंगा झेंडा मध्ये हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. तो आपल्या देशाची शान व अभिमान आहे. त्यात प्रामुख्याने केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग आहेत.तिरंग्यात सर्वात वर केशरी रंग आहे. तो त्याग व शौर्याचे प्रतीक आहे. मध्यभागी पांढरा रंग असून तो स्वच्छता, शांतता व पवित्रतेचे प्रतीक आहे. तिरंग्यात सर्वात खाली हिरवा रंग आहे. तो समृद्धी व संपन्नता यांचे प्रतीक आहे.मध्यभागी पांढ-या रंगाच्या मध्ये निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. त्यात २४ आरे आहेत. ते सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेण्यात आले आहे.२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगा ध्वज' हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्यात आला.तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज देशाचा एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. तो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांची आठवण करून देतो. आपण सदैव आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे पण माजलगाव नगरपरिषद चे अधिकारी, कर्मचारींना माहीत नाही वाटत पुर्ण शहरात बॅनर टाकुन हुशारपणा दाखविले आहे. हयात संबंधित अधिकारी, कर्मचारीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा