Subscribe Us

header ads

माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सुचनेवरून परळी ते बीड रोडवरील टोकवाडी गावाजवळील खड्डे बुजवण्यास सुरुवात ; टोकवाडी भाजपच्या मागणीला यश

बीड स्पीड न्यूज 



माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सुचनेवरून परळी ते बीड रोडवरील टोकवाडी गावाजवळील खड्डे बुजवण्यास सुरुवात ; टोकवाडी भाजपच्या मागणीला यश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सुचनेवरून परळी ते बीड रोडवरील टोकवाडी गावाजवळील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. टोकवाडी भाजपने वेळोवेळी पाठवपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.परळी - बीड या रस्त्यावर मोठे खड्डे झाल्यामुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यू सापळा झाला आहे. तसेच परळी तालुक्यातील टोकवाडी जवळ खड्डे झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना अपघातास निमंत्रण घावे लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत  माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली टोकवाडी भाजप व भाजपाचे युवा नेते रोहित (आबा)मुंडे यांनी वेळोवेळी केली होती. त्यामुळे या मागणी यश आले आहे. मंगळवार दि.08 ऑगस्ट रोजी खड्डे बुजवण्यास प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली आहे.परळी ते बीड या राष्ट्रीय राज्य महामार्गावरची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर खड्डे झाल्यामुळे मृत्यूचा 

सापळा बनला आहे. रस्त्यावर दररोज अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता खड्डेमय झाला असून मोठे मोठे अपघात होत आहे. रस्तावरील खड्डे चुकवितांना अशा प्रकारेच अपघात घडत आहेत. त्यामुळे परळी-सिरसाळा-बीड या रस्त्यावरील खड्डे बजवावेत व वाहन धारकांना दिलासा घावा तसेच या रस्त्यावर वाहन धारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे संबधीत विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात करण्यात आली आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजवन्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिकांनी आभार मानले आहेत. यावेळी श्री संजय मुंडे तालुका उपाध्यक्ष भाजपा, तुकाराम मुंडे (टी. डी.), युवा नेते रोहित मुंडे,संजय श्रीराम मुंडे, नामदेव वि. मुंडे, मिननाथ मुंडे, तुकाराम मुंडे, अनंत मनोहर मुंडे, राजाभाऊ मुंडे, गोविंद मुंडे, प्रल्हाद जगताप, माधव मुंडे, बालू मुंडे, गणेश मुंडे, सुखदेव मुंडे,तसेच टोकवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा