Subscribe Us

header ads

अत्याधुनिक व्हिडिओ दुर्बीणद्वारे रविवारी मोफत मुळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


अत्याधुनिक व्हिडिओ दुर्बीणद्वारे रविवारी मोफत मुळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन 

(बीड / प्रतिनिधी)  डॉ. के. एम. कोळेकर यांच्या अथर्व मूळव्याध क्लिनिक व रोटरी क्लब बीड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी अत्याधुनिक व्हिडिओ प्रोटोस्कोपद्वारे मोफत मुळव्याध व भगंदर तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.डॉ. के. एम. कोळेकर हे गेल्या २२ वर्षापासून मुळव्याध व भगंदर रुग्णांना बीड येथे सेवा देत आहेत. मुळव्याधासाठी इंजेक्शन तसेच भगंदरसाठी क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीचा फायदा हजारो रुग्णांना या कालावधीमध्ये झाला आहे. नुकतीच अत्याधुनिक व्हिडिओ प्रोटोस्कोप व ल्यासोट्रोनिक्स १४७० या लेसर मशीन ची सुविधा अथर्व मूळव्याध क्लिनिक मध्ये उपलब्ध झाली आहे.या निमित्ताने संडास वाटे रक्त पडणे, आग होणे, कोंब बाहेर येणे, संडासच्या जागेभोवती बेंड येणे, पू व रक्त जाणे या समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. के. एम. कोळेकर आणि स्त्री रुग्णांसाठी डॉ. सौ. शिल्पा कोळेकर या तपासणी करणार आहेत. शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांना ऑपरेशनच्या खर्चामध्ये सवलत दिली जाणार आहे.हे शिबिर अथर्व मूळव्याध क्लीनिक, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ, स्वामी समर्थ मंदिरा समोर सकाळी १० ते ३ या वेळेत संपन्न होणार आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब बीड सिटीचे अध्यक्ष रो. विष्णुदास तापडिया सचिव रो. दीपक कर्नावट व प्रोजेक्ट चेअरमन रो. प्रदीप शेटे, रो. श्याम सानप यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा