Subscribe Us

header ads

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर वंजारवाडीला देणार सदिच्छा भेट वैजिनाथ तांदळे यांनी दिलेले निमंत्रण स्विकारले


बीड स्पीड न्यूज 


विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर वंजारवाडीला देणार सदिच्छा भेट वैजिनाथ तांदळे यांनी दिलेले निमंत्रण स्विकारले




बीड, प्रतिनिधी : - विकासाचे रोल मॉडेल बनत असलेल्या बीड तालुक्यातील वंजारवाडी गावाला सदिच्छा भेट देऊन विकास कामांची पहाणी करावी, गावाला पर्यटनस्थळ बनवण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती वैजिनाथ तांदळे यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली होती. त्यांचे निमंत्रण विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी स्विकारले. अगामी दौर्‍यात वंजारवाडी गावाला सदिच्छा भेट देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.निष्कलंक सनदी अधिकारी अशी विभागीय आयुक्त सनिल केंद्रेकर यांची ओळख आहे. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम एवढ्या वर्षानंतरही बीडकरांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे केंद्रेकर यांचे बीड जिल्ह्यावर नितांत प्रेम आहे. ईथल्या सामान्यातील सामान्य माणसाच्या एका फोनवर ते कामे करतात. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी बुधवारी (दि.10) बीड येथील बीड जिल्हा पत्रकार संघाच्या स. मा. गर्गे भवन येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी वंजारवाडी 
गावचा विकासाच्या बाबतीत कायापालट करणारे वैजिनाथ तांदळे यांनी केंद्रेकर यांची भेट घेत वंजारवाडी गावाला सदिच्छा भेट देण्याची विनंती केली. गावातील विकासकामे पाहून आणखी काय करता येईल या दृष्टीने मार्गदर्शन करावे, अशी विनंती तांदळे यांनी विभागीय आयुक्तांना केली. यावेळी सुनिल केंद्रेकर यांनी वंजारवाडी गावाला सदिच्छा भेट देण्याचे निमंत्रण स्विकारत अगामी बीड दौर्‍यात गावात येणार असल्याचे सांगीतले. यावेळी केंद्र्ेकर यांनी तांदळे यांच्याशी मनकोकळा संवाद साधला. गावात केलेल्या विकास कामांची माहिती घेतली. दरम्यान थेट विभागीय आयुक्तांनी  सदिच्छा भेट देण्याचे निमंत्रण स्विकारल्याने वैजिनाथ तांदळे यांनी पुष्पगुच्छ देत केंद्रेकर यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, संपादक संतोष मानुरकर, वैभव स्वामी यांची उपस्थिती होती.

वंजारवाडी विकासाचे रोल मॉडेल

शासनाच्या विविध अभीयानात सहभाग घेऊन अनेक गावांनी आदर्श गावाचा पुरस्कार मिळवला आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही योजनेत सहभाग न घेता देखील वंजारवाडी गावाने वैजिनाथ तांदळे, भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा मुलभूत आणि शास्वस विकास केला आहे. तब्बल 35 वर्षापासून ही ग्रामपंचायत तांदळे बंधुंच्या ताब्यात आहे. गाव व्यसनमुक्त असून हजारो झाडांचे वृक्षारोपण करून प्रत्येक झाडाला ठीबकची सोय केली आहे. दर्जेदार शाळा, रस्ते, किल्ल्यासारखे मंदीर, सार्वजनिक आणि स्वस्त किराना दुकान, दाळ मिल, सार्वजनिक पीठाची गिरणी, शेंगा फोडण्याचे यंत्र, जलसंधारणाची दर्जेदार कामे या गावात झाली आहेत. गावात गेल्यानंतर प्रत्येकाला वंजारवाडी गाव हे प्रत्यक्षातले विकासाचे रोल मॉडेल वाटते, हे विशेष!


वंजारवाडी बनू शकते पर्यटनस्थळ

बीड तालुक्यातील वंजारवाडी गाव अतिशय निसर्गरम्य ठिकाणी छोट्याशा टेकडीवर वसलेले आहे. गावाच्या दक्षीणेला साठवण तलाव असून सारा शिवार ग्रीण बेल्ट आहे. तलावाच्या परिसरात योजना राबवली तर वंजारवाडी हे गाव बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बनू शकते. यासाठी भाजपा नेते सर्जेराव तांदळे व राष्ट्रवादीचे वैजिनाथ तांदळे हे बंधू प्रयत्नशील आहेत.विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर हे बीडमध्ये आले असता त्यांना वंजारवाडी गावाला सदिच्छा भेट देण्याचे निमंत्रण वैजिनाथ तांदळे यांनी दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा