Subscribe Us

header ads

ज्योतीताई मेटेंनी शिवसंग्राम पक्षाचे नेतृत्व करावं; कार्यकारिणीची बैठकीमध्ये ठराव

बीड स्पीड न्यूज 


ज्योतीताई मेटेंनी शिवसंग्राम पक्षाचे नेतृत्व करावं; कार्यकारिणीची बैठकीमध्ये ठराव


बीड |प्रतिनिधी -: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटना आणि भारतीय संग्राम परिषद या पक्षाचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता? याबाबत आज बीड जिल्हा शिवसंग्राम आणि भारतीय संग्राम परिषदेच्या कार्यकारिणीची एक बैठक बीडमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी यापुढे शिवसंग्राम आणि भारतीय संग्राम पक्षाचे नेतृत्व करावे असा एक ठराव मंजूर करण्यात आला. शिवसंग्रामचे बीडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे यांनी याबाबची माहिती दिली आहे. त्यामुळे आता शिवसंग्राम आणि भारतीय संग्राम परिषदे या पक्षाचे नेतृत्व विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विनायक मेटे हयात असताना त्यांच्या पक्ष संघटनेने अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून समर्थपणे काम केले आहे. वेळोवेळी भारतीय जनता पक्षाला अनेक मार्गाने बळ देण्याचे काम विनायक मेटे यांनी केले. त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलेला होता आणि आता राज्यपालांकडून जे बारा आमदार नियुक्त करण्यात येणार आहेत त्यात मेटे यांना संधी दिली जाईल आणि कॅबिनेट मंत्री देखील करण्यात येईल असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना दिला होता. मात्र त्या पूर्वीच मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे आता ज्योती मेंटे यांना विधानपरिषदेची शिवसंग्रामची हक्काची जागा देण्यात यावी अशी मागणी प्रदेश कार्यकारिणीकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. विनायक मेटे यांनी पाहिलेलं शिव स्मारकाचे स्वप्न आणि मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्योतीताई यांना आता भाजपने विधान परिषदेचे सदस्यत्व द्यावं अशी भावना शिवसंग्रामच्या या बैठकीस ठराव मंजूर करण्यात आला.या वेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे हे होते. या बैठकीस शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किसन कदम, रामदास नाईकवाडे, जिल्हा सरचिटणीस सुनिल आरसुळ, ओबीसी आघाडीचे लक्ष्मण ढवळे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पठाण फेरोज खान, सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, ऊसतोड कामगार नेते बबन माने, गेवराईचे तालुकाध्यक्ष कैलास माने व इतर जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा