Subscribe Us

header ads

सपना चौधरीच्या ठुमक्यावर बीडकर थिरकले

बीड स्पीड न्यूज 


 सपना चौधरीच्या ठुमक्यावर बीडकर थिरकले 


बीड -: कोरोनाच्या सावटनंतर बीड जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. हरियाणा येथील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिला पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर मिळेल त्या ठिकाणी बसून सपनाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली. बीडमधील दीप ज्योत ग्रुपच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षानंतर बीडकरांनी दहीहंडीचा अनुभव घेतला आहे. तेरी अखियों का ये काजल. या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले.शिवसेना नेते योगेश क्षीरसागर, भाजप नेते भगीरथ बियाणी यासह विविध पक्षातील मंडळी सपनाचा डान्स पाहण्यासाठी आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा