Subscribe Us

header ads

तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी

बीड स्पीड न्यूज 


तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी



बीड(प्रतिनिधी):-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी दोन्ही महान विभूतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अण्णाभाऊ साठे यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मराठी साहित्यातील लोकनाट्य,पोवाडे,लावणी,प्रवास वर्णन,कथा,कविता,गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला.१ ऑगस्ट रोजी या दोन्ही महान विभूतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डी.जी.निकाळजे यांच्यासह सर्व प्राध्यापक,कर्मचारी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा