Subscribe Us

header ads

जिल्ह्यातील असंख्य वयोवृद्ध तमाशा कलाकार व कलावंत मानधना पासून वंचित- शैला मुसळे

बीड स्पीड न्यूज 



जिल्ह्यातील असंख्य वयोवृद्ध तमाशा कलाकार व कलावंत मानधना पासून वंचित- शैला मुसळे 

जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने मानधन चालू करा यासाठी निवेदनाद्वारे केली मागणी

बीड प्रतिनिधी / दि.१ ऑगस्ट  शैलाताई मुसळे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला व सेवा प्रतिष्ठान,व पद्मिनी बाई अंधारे मानधन शासकीय समिती राज्य सदस्य,व कलावंतांचे शिष्टमंडळ भेटले जिल्हाधिकारी यांना केली प्रस्ताव दाखल करून घ्यावेत व मंजूर करून देण्यात यावी यासाठी निवेदनाद्वारे केली मागणी, बीड जिल्हयामध्ये जवळपास ५००० पेक्षा अधिक तमाशा कलावंत आहेत. यामधून काही वयोवृद्ध कलावंतांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येणान्या मानधनासाठी वेळोवेळी विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण अर्ज दाखल केले आहेत. मात्र आपल्या प्रशासकीय यंत्रणांकडून दाखल करण्यात आलेल्या वयोवृद्ध कलावंतांच्या फायलींचे दखल न घेता खऱ्या लाभार्थी असणाऱ्या या कलावंतांना हक्काच्या मानधनांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनासाठी लागणारे सर्व पुरावे देऊन, कलावंतानी सादर केलेल्या कार्यक्रमाची छपाविने देऊन सुद्धा आजपर्यंत या तमाशा कलावंतांना न्याय मिळालेला नाही या सर्व कलाकारांना दहा ते पंधरा वर्षापासून हक्काच्या मिळणाऱ्या मानधनापासून वंचित राहण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. मानधनासाठी फाईल दाखल करण्यासाठी आलेला खर्च आणि गेलेला अमूल्य वेळ यातून 

कलावंतामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे अनेक कलावंत तर हक्काचे मानधन मिळेल या प्रतीक्षेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र मानधन मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या कलावंतांनी आपल्या कलेतून या समाजाला योगदान दिले आहे त्याच कलावंतांना मानधनापासून वंचित ठेवून प्रशासन त्यांना अपमानित करत आहे.मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोना महामारीमुळे या वृद्ध कलावंतांचे तर बेहाल झाले आहेत. प्रामुख्याने सर्वच कलावंत यामध्ये गोंधळी, नाटककार, आराधी, साहित्यिक, तमाशा कलावंत होरपळून निघालेले आहेत. दैनंदिन रोजगार ठप्प झाल्याने या कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली होती. या परिस्थितीत अजूनही फारसा बदल झालेला नाही कोरोना महामारीमध्ये तर मोठ्या प्रमाणात कलावंतांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांचे कुटुंबीय उध्वस्त झालेले आहेत. कलावंतांच्या आयुष्यामध्ये नैराशीचे वातावरण असून मानसिकता बिकट बनलेली आहे. या गंभीर बाबीचा प्रशासनाने आणि शासनाने गांभीर्याने विचार करून या तमाशा कलावंतांची विशेष बाब म्हणून दाखल करण्यात आलेल्या मानधनाबाबतच्या सर्व फायली मंजूर करण्यात याव्यात. त्यांच्या बाब सहानुभूतीपूर्वक विचार करून मानधन मंजूर करावे, अन्यथा कलावंतांच्या न्याय हक्कासा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागेल. याच्या होणाऱ्या परिणामास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. तरी आमच्या मागणीला मार्गी लावावे असे भेटीला आलेल्या शिष्टमंडळाने सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा