Subscribe Us

header ads

केन स्टार अकॅडमी, सेलू येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचा उलघडा

बीड स्पीड न्यूज 

सातोना/ पांडूरंग शिंदे

केन स्टार अकॅडमी, सेलू येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचा उलघडा


सातोना-: केन स्टार प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल, देवला पुनर्वसन, सेलू येथे शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय, सेलू चे माजी मुख्याध्यापक श्री. कादासे सर, तसेच गोमे वाकडी, जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. आबासाहेब लोंढे सर , शाळेचे प्रिंसीपल तथा संचालक श्री. श्रीराम रेंगे सर, संचालक श्री कृष्णा गीते सर यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा थेटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम रेंगे सर यांनी केले, तसेच शाळेतील शिक्षिका सौ. अनुसया वाघमारे, सविता इंगोले, आशा काळे यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले , तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री. आबासाहेब लोंढे सर यांनी आपल्या भाषणातून आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचा उलघडा केला,व एम. कादासे सर यांनी आपल्या भाषणातून  साठे यांच्या जीवनाचा परिचय करून दिला त्यांच्या कार्याची माहिती करून  दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. जया माने यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा