Subscribe Us

header ads

धुळे सोलापूर रोडवर बेशरमाचे झाडे लावा आंदोलन

बीड स्पीड न्यूज 


धुळे सोलापूर रोडवर बेशरमाचे झाडे लावा आंदोलन

बीड | प्रतिनिधी -: १८ कोटी खर्चुनही राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर चिखलमय, रखडलेल्या रस्ता कामाच्या निषेधार्थ दुभाजकात बेशरमाची झाडे लावा आंदोलन डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.बीड शहरातुन जाणा-या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट क्रॉक्रीट रस्त्याचे काम अपुर्णच असुन जालना रोड वरील काकु नाना हॉस्पिटल ते राष्ट्रवादी भवन या दरम्यानच्या रस्त्यासाठी जवळपास १८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला तरी सुद्धा रस्तेकाम अपुर्णच असुन बाजुचे साईडपट्टे काही ठिकाणी भरलेच नाहीत तर काही ठिकाणी मुख्माने भरल्याने आता पावसाळ्यात त्याचा चिखल झाला असून रस्त्या वरील वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले असुन जालना रोडवरील दुभाजकांचे काम अर्धवट असुन दोन रस्त्यांच्या दुभाजकात अद्यापही माती भरलेली असुन आता दबल्याने खड्डे पडलेले आहेत त्यात वाहने अडकुन अपघातात वाढ झाली आहे याविषयी संबधितांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा सुधारणा न केल्याबद्दल बेशरम प्रशासन - ठेकेदाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जालना रोडवरील सेंट एन्स इंग्लिश स्कूल समोरील जालना रोडवरील माती भरलेल्या दुभाजकात बेशरमाची झाडे लाऊन बेशरम प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, बालाजी जगतकर कार्याध्यक्ष बीड जिल्हा बाल हक्क संरक्षण संघ, बीड जिल्हा संघटक शेख मुबीन बीडकर आदि सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा