Subscribe Us

header ads

गढी महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

बीड स्पीड न्यूज 


गढी महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी              


बीड(प्रतिनिधी):- जयभवानी शिक्षण  प्रसारक मंडळ, गेवराई संचलित कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून थोर स्वातंत्र्यसेनानी,समाज सुधारक,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सरकटे एस. एच. यांच्या शुभहस्ते  लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या  कार्यावर प्रो. डॉ. रामहरी फाटक  यांनी मनोगतातून प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचाअध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सरकटे एस. एच. सरांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे भारतीय असंतोषाचे जनक, जहालमतवादी, क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करून मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.जाधव आर. जे. यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ घुगे एस. पी. यांनी केले.कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा. डॉ यशवंतकर एस.एल.,प्रा. रिंगणे आर.बी.रा. से यो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. काकडे एस. आर., आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाचे प्रा.डॉ.खताळ आर.डी. यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा