Subscribe Us

header ads

तगड्या बंदोबस्तामध्ये बार्टीची चाळणी परीक्षा!


बीड स्पीड न्यूज 


तगड्या बंदोबस्तामध्ये बार्टीची चाळणी परीक्षा!

समाज कल्याण विभागाच्या निगराणीखाली परीक्षा पडली पार

बीड / प्रतिनिधी-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून रविवार (दि.२६) रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता एकूण ७०२ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तब्बल ६४४  विद्यार्थ्यांनी शहरातील तंत्र निकेतन महाविद्यालयात ही चाळणी परीक्षा दिली. ही चाळणी परीक्षा जात पडताळणी विभागाच्या उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड संगीत मकरंद, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. लोहोकरे, प्रा. सुहास वीर सम्राट, प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहूल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १५० कर्मचार्‍यांनी काम पाहिले. त्यामुळे ही चाळणी परीक्षा अतिशय सुरळीत पार पडली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून बँक, रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये  बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या 

स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी ७०२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदासाठी ६४४ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. चाळणी परीक्षा पार पाडण्यासाठी  सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे केंद्रप्रमुख यशवंत वाव्हळकर, केंद्र सहाय्यक प्रा.अविनाश वडमारे, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. भरत खेत्री, प्रा. शिवाजी रुपनर, प्रा.देवेंद्र कांबळे, प्रा.प्रतीक्षा हिवरकर, प्रा. सूरज साळवे, प्रा. दीपक सोनवणे, लेखापाल अंबिका शिंदे, ग्रंथपाल सचिन काकडे, अनिल डोंगरे, लिपिक विनोद जोगदंड, दिलीप गायकवाड, फोटोग्राफर राहुल शिंदे, मुकेश निसर्गंध दीपाली निर्मळ,  कार्यांलयीन कर्मचारी  यांच्यासह समाज कल्याण विभाग आणि सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या कर्मचारी वर्गणी परिश्रम घेतले.



पुढच्या आठवड्यात निकाल

बार्टीच्या सीईटी परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात  जाहीर केला जाणार आहे.त्यापूर्वी बार्टीच्या संकेस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उत्तर तालिका अपलोड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात काही तक्रारी असतील तर त्यांना त्या थेट बार्टी संकेस्थळावर नोंदविता येणार आहेत. त्यानंतर सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होणार होणार आहे.



विद्यार्थ्यांनी निभावली स्वयंकसेवकाची भूमिका

चाळणी परीक्षेसाठी बार्टी केंद्रातील विद्यार्थ्यांनी स्वयंकसेवकाची भूमिका निभावली. परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थींना काही गैरसोय होऊ नये यासाठी सदरील स्वयंकसेवक विद्यार्थी आपले मोलाचे सहकार्य दिले. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा