Subscribe Us

header ads

बीडमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्य दिंडीने वेधले लक्ष!

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्य दिंडीने वेधले लक्ष!

साहित्यसम्राट गौरव महोत्सव :राज्याला आदर्श देतील असे राबले कार्यक्रम


बीड / प्रतिनिधी-: साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये साहित्य सम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात  गुरुवार दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत विविध परिवर्तनिय कार्यक्रम पार पडले. त्या अनुषंगाने महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बीड शहरातून अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यांची दिंडी काढण्यात आली.या साहित्य दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले.दरम्यान डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे आणि चित्रपट निर्माता सतीश विटकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पार पडला.साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये साहित्यसम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात लहुजी वस्ताद शरीरसौष्ठव स्पर्धा, सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा  गाणे अण्णाभाऊंचे हा कार्यक्रम, ५०० महिलांना साड्यांचे वाटप, आणि सोमवार (ता.१) ऑगस्ट रोजी सकाळी शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापाशी अण्णाभाऊंनी लिहिलेल्या साहित्यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या साहित्य दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.यावेळी अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय मोठ्या संख्येने पुतळ्यापाशी उपस्थित होता. डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे आणि चित्रपट निर्माता सतीश विटकर यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या महोत्सवाने एक आदर्श पायंडा पडला आहे. त्यामुळे या महोत्सवाची अवघ्या राज्यात चर्चा आहे.




कथांमधून काळाशी सुसंगती

अण्णाभाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले. अशा भावना साहित्य दिंडीच्या पूजनावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.



पुरोगामित्वाची परंपरा शिवरायवंदन!

अण्णा भाऊंनी आपल्या पुरोगामी-समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण-गवळण ढाच्यातही आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजासारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. असे मनोगत अण्णाभाऊंना अभिवादन करतेवेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा