Subscribe Us

header ads

राजीव नगर, अंकुश नगर, धानोरा रोड, ची इस्ट्रेट लाईट एक महिन्या पासून बंद नगर पालिकेचा दुर्लक्ष

बीड स्पीड न्यूज 


राजीव नगर, अंकुश नगर, धानोरा रोड, ची इस्ट्रेट लाईट एक महिन्या पासून बंद नगर पालिकेचा दुर्लक्ष 



बीड |प्रतिनिधी -: राजीव नगर अंकुश नगर धानोरा रोड येथे एक महिन्या पासून इस्ट्रेट लाईट बंद असल्याने नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. या भागात अनेक मुली पोलीस भरतीच्या प्रॅक्टिस साठी येतात येथे लाईट नसल्याने कुत्रे अंगावर धाऊन येत आहे. गाडी वाले अंधाराचे फायदा घेत अंगावर येत आहेत महिला सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात अंधार असल्याने रस्त्यात झोपलेल्या कुत्र्यांवर पाय पडत आहेत. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. लाईट नसल्याने येथे काहीही अनुचित प्रकार घडू शकतात लाईट ऑफिसला फोन केला तर हे काम आमचे नाही नगर पालिकेचे आहे. असे सांगितले जाते नगर पालिका कोणत्याही प्रकारचे काम करत नाहीं आणि या भागातील नगरसेवक तर मतदान आल्यावरच या भागात येतात मतदान झाले की येथे कोणी बघत ही नाही जर नगरसेवक फक्त मतदान घेऊन या भागांतील महिलांना नागरिकांना वाऱ्यावर सोडून देण्यासाठी निवडून येतात का हा मोठा प्रश्न आहे. मतदान जवळ आले की  मोठे मोठे आश्वासन देतात आणि निवडूण आले की एक काम देखील करत नाहित तरी या भागांतील लाईट लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मागणी या भागातील लोक करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा