Subscribe Us

header ads

घरोघरी तिरंगा मोहीम यशस्वी करावी- जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार

बीड स्पीड न्यूज 



घरोघरी तिरंगा मोहीम यशस्वी करावी- जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार

 

बीड|प्रतिनिधी  दि, 03,-:  केज तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने घरोघरी तिरंगा ही मोहीम यशस्वीपणे राबवावी. या मोहिमेंतर्गत केज तालुक्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना व प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज उभारावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी केले.पंचायत समिती, केज येथे घरोघरी तिरंगा मोहीम व अन्य विषयांच्या अनुषंगाने सरपंच व ग्रामसेवक, कार्यालयीन कर्मचारी यांची संयुक्त आढावा बैठक व कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार म्हणाले, "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरांवर उभारलेले राष्ट्रध्वज 

दररोज संध्याकाळी खाली उतरवायची गरज नाही. मात्र, ध्वजसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.यावेळी घरोघरी तिरंगा उपक्रमासोबत नरेगा, वृक्षारोपण, पाणंद रस्ते, रेन वॉटर हार्वेस्टिंग, माझा गाव, सुंदर गाव, समृध्द गाव अभियान, घरकुल योजना आदिंचा आढावा घेऊन विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, पाटोदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुमित जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) प्रमोद काळे, बीड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिरूद्ध सानप, यशदाचे मास्टर ट्रेनर श्री. इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. (पं.) ज्ञानोबा मोकाटे यांनी या कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा