Subscribe Us

header ads

युथ आयडल चा आदर्श उपक्रम

बीड स्पीड न्यूज 


युथ आयडल चा आदर्श उपक्रम

समाजसेवक शरद झोडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा

बीड|प्रतिनिधी-: वाढदिवस म्हटलं की केक, हारतुरे, फटाके, डीजे हा अवाढव्य खर्च आला परंतु सध्या सामाजिक प्रबोधनाने सध्याची युवा पिढी बदलत आहे खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमाला हातभार लावत नवयुवक वाढदिवस साजरा करत आहेत . हे येणाऱ्या पिढीसाठी आदर्श ठरतील यात काही शंका नाही . बीड येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडल शरद भैय्या झोडगे यांनी आपला वाढदिवस बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्र येथे गरजवंतांना ब्लॅंकेट व फळे वाटप करून तसेच ढेकणमोहा येथील पसायदान सेवा प्रकल्प येथे गरजू मुलांना शालेय साहित्य व अन्नदान करून  वाढदिवस साजरा केला. सदरील कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे राजु भैय्या गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक दादा ढोले पाटील, समाजसेवक प्रवीण पालीमकर तसेच समाजसेवक विष्णूबाळ झोडगे यांनी केले होते, तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उमेश जाधव(दंडम अण्णा), भावी नगरसेवक सातीराम आण्णा ढोले, युवकहृदयसम्राट विपुल भैया गायकवाड, सरपंच हरी पवार, तसेच व्यसनमुक्ती सेल चे शिवा माने, दिलीप राठोड, सुरेश माने, अजय गमे, महेश जाधव, रंजीत जाधव,दत्ता जगताप, एन. के. पाटील, राम सावंत, पायल वंजारे, सायली सोनवणे, निखिल फुंदे, विशाल मिसाळ, विशाल जोगदंड, भागवत काळे, विशाल मांडवे, महेश जागृत आधी सर्व जिवलग मित्रपरिवार उपस्थित होता..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा