Subscribe Us

header ads

पुरुषार्थाने प्रारब्धावर मात करता येते अजित पवार यांचे प्रतिपादन; कारागृहातील कैद्यांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था

बीड स्पीड न्यूज 

पुरुषार्थाने प्रारब्धावर मात करता येते अजित पवार यांचे प्रतिपादन; कारागृहातील कैद्यांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था

बीड : एखाद्या चुकीची शिक्षा म्हणून तुम्हाला या ठिकाणी यावे लागले. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. या ठिकाणाहून चांगले विचार घेऊन बाहेर पडा, पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येऊ शकते असे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले.बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी रोटरी क्लब ऑफ  बीडच्या वतीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, माणिकराव देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने पुस्तक वाटप कार्यक्रमावेळी सीईओ अजित पवार बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, कारागृह अधिक्षक विलास भोईटे, अधिव्याख्याता डॉ.विक्रम सारुक, पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, रोटरी क्लब ऑफ  बीडचे अध्यक्ष कल्याणराव कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी, कारागृह उपाधीक्षक गंगाधर वडने, मुलानी, माळशिखरे , बळीराम गवते , अ‍ॅड.राज पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ  बीडच्या अध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल सीईओ अजित पवार, कारागृह अधिक्षक विलास भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एस.एम. देशमुख, कल्याणराव कुलकर्णी, विलास भोईटे, विक्रम 

सारुक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्व.माणिकराव देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने शंभर पुस्तके कारागृहातील वाचनालयासाठी सुपूर्द करण्यात आली. अध्यक्षीय समारोप करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, विलास भोईटे व आम्ही शाळा, कॉलेजातील मित्र. प्रारब्धाने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो. तुम्हाला देखील एखाद्या चुकीने या ठिकाणी येण्यास भाग पाडले. परंतु ही परिस्थितीही बदलता येऊ शकते. यासाठी चांगले विचार आत्मसात करुन या ठिकाणाहून बाहेर पडा, पुरुषार्थ दाखवून प्रारब्ध बदलता येते असा संदेश यावेळी दिला.कार्यक्रमास रोटरी क्लबचे वाय.जनार्धन राव, विवेक बडगे, प्रा.खांडे, जीवन जोगदंड, सुभाष हुंबे, संदीप खोड,संतोष पवार आदी रोटरियन यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष चौरे, अनिल वाघमारे, अनिल महाजन, उदय नागरगोजे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पवळ सर यांनी केले.

अबीर गुलाल उधळीत रंग’

यावेळी बंदीवानामधील दोघांनी विविध अभंग, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना इतर बंदीवानांनी सुरेख साथ दिली.  सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या या बंदीवानांनी सादर केलेल्या ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या अभंगाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. तसेच दोघांचा सत्कारही करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा