बीड स्पीड न्यूज
पावर ग्रिड कार्पोरेशनच्या वतीने जिल्हा रुग्णालयास जिल्हाधिकारींच्या हस्ते रुग्णवाहिका अर्पण
बीड | प्रतिनिधी -: दि. २२:--पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया, वेस्टर्न रिजन पॉवर ट्रान्समिशन सिस्टम वन च्या वतीने सी.एस.आर. (सामाजिक बांधिलकी उपक्रमा)अंतर्गत अत्याधुनिक लाईफ सपोर्ट ॲम्बुलन्स जिल्हा रुग्णालयास देण्यात आली. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते आणि पावर ग्रिड कार्पोरेशनचे एस.रवींद्रकुमार, कार्यपालक निदेशक पावर ग्रिड पश्चिम क्षेत्र-1 यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रुग्णवाहिका हस्तांतरण सोहळा संपन्न झाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या हस्तांतरण प्रसंगी आर. नारायण, महाप्रबंधक मानव संसाधन , निलेश ठाकरे, विजय महंत, उपमहाप्रबंधक,पावर ग्रिड काँर्पोरेशन परळी आणि राजदीप बनसोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बीड उपस्थित होते.
0 टिप्पण्या