Subscribe Us

header ads

अंबाजोगाई आणि केज या दोन शहरातील समस्यांसह इतर महत्वाच्या विविध प्रश्नांवर आ.नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेत खालील मागण्या केल्या

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी ,शेख फिरोज


अंबाजोगाई आणि केज या दोन शहरातील समस्यांसह इतर महत्वाच्या विविध प्रश्नांवर आ.नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेत खालील मागण्या केल्या


अंबाजोगाई | प्रतिनिधी दि. 22 -:  केज शहरासाठी मंजूर असलेले लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे सभागृह त्वरित सुरु करावे. याविषयी मी मागील दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. अंबाजोगाई शहराची हद्दवाढ करण्यात यावी. शहरालगत असणाऱ्या गावातील नागरिकांना शहरी सुविधा देणे प्रशासकीय मर्यादांमुळे त्या-त्या ग्रामपंचायतींच्या आवाक्यात राहिले नसल्याने नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना प्रशासकपदी नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडून पारदर्शक होणे शक्य नसल्याने त्यांना तत्काळ हटवून इतर नगर परिषदांप्रमाणे उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रशासकपदी नेमण्यात यावे.अंबाजोगाई आणि केज शहरांसाठी भूमिगत गटार योजनेस तत्काळ मंजुरी देण्यात यावी. नेकनूर ही बीड जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. हे गाव अधिक चांगले विकसित होण्यासाठी नगर पंचायतचा दर्जा द्यावा. दोन जिल्ह्यांना जोडणारा लोखंडी सावरगाव जंक्शन ते कळंब हा राज्यरस्ता अतिशय वर्दळीचा असून तो पालखी मार्ग देखील आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी.नांदूरघाट ते नांदूरफाटा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.केज विधानसभा मतदार संघातील अनेक रस्त्यांची दर्जोन्नती करून त्यांना राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा