Subscribe Us

header ads

महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत असंघटित बांधकाम व इतर कामगारांचे 2019 ते 2022 पर्यंत संपूर्ण विद्युत देयक (विज बिल) माफ करण्यात यावे-- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत असंघटित बांधकाम व इतर कामगारांचे 2019 ते  2022 पर्यंत संपूर्ण विद्युत देयक (विज बिल) माफ करण्यात यावे-- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड (प्रतिनिधी)  2019 पासून आपल्या देशात पारतंत्र्यातून आलेल्या कोरोना विषाणूने थैमान घातले आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले दीर्घकाळ टाळेबंदी मुळे उद्योग व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले. कामगारांच्या हाताचे काम हिरावून गेले एकंदरीत चं संबध मानव समूहाची हानी झाली अशा भीषण काळात केंद्र आणि राज्य सरकारने यथायोग्य नियोजन करत परिस्थिती हाताळत जनजीवन पूर्वपदावर आणले,सलग दोन वर्ष या संकटातून बाहेर पडण्यासाठी अवधी लागला,टाळेबंदीत महाराष्ट्रातील बांधकाम, सुतार काम, विणकाम, रंगरंगोटी करणारे कामगार , व इतर सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांचे जीवन जगणे देखील असाह्य झाले होते. परंतु आजतागायत कामगारांच्या हाताला काम मिळाल्याने त्यांचा उदरनिर्वाह भागत आहे.किंतु या दोन वर्षाच्या काळात कामगारांवर घरगुती वापरचे विद्युत देयक भरणा न केल्याने त्यात वाढ होऊन आवाच्या सव्वा विद्युत देयक आकारले जात आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत असंघटित कामगारांचे 31 जानेवारी 2019 ते 1 जानेवारी 2022 पर्यंत चे विद्युत देयक (विज बील) माफ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड,अशोक कांबळे,मंगेश जोगदंड,महादेव वंजारे,सचिन जाधव,नाना मामा कदम,राजेशभाई कोकाटे,विष्णू गायकवाड,अक्षय कोरडे, सह आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा