Subscribe Us

header ads

नागरिकांनी सन्मानाने राष्ट्रध्वज उतरवून तिरंगा राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा-डॉ.संतोष मुंडे

बीड स्पीड न्यूज 


नागरिकांनी सन्मानाने राष्ट्रध्वज उतरवून तिरंगा राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा-डॉ.संतोष मुंडे

राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने प्रशासनाने कठोर भुमिका घ्यावी

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- राष्ट्रप्रेमाचे प्रतिक असलेला तिरंगा दि.13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस नागरीकांना आपापल्या घरी व खाजगी मालमत्तेवर फडकावण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती.स्वातंत्र्यदिन होवुन सात दिवस उलटले तरी अनेकांच्या घरावर,वाहनावर, दुकानावर तिरंगा ध्वज असुन हा एकप्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान असुन नागरीकांनी राष्ट्रध्वज उतरवुन घ्यावेत.यासाठी प्रशासनाने मोहीम राबवून राष्ट्रध्वज न उतरवणार्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष  डॉ.संतोष मुंडे यांनी केली आहे.याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त सर्व सामान्य नागरीकांना आपल्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी तिरंगा फडकावण्याची परवानगी दिली होती.यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या त्यात राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनी सायंकाळी उतरवावेत असे आवाहन करण्यात आले होते.स्वातंत्र्यदिन होवुन सात दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी तिरंगा फडकताना दिसत आहे.वारा,पाऊस यामुळे ध्वज फाटुन अवमान होत आहे.ज्या नागरीकांनी राष्ट्रध्वज उतरवले नाहीत अशा नागरीकांनी सन्मनाने तिरंगा उतरवुन घ्यावा असे आवाहन करत जे नागरीक तिरंगा उतरण्यास दुर्लक्ष करत आहेत त्यासाठी तहसिल,पोलिस व नगरपालिका प्रशासनाने मोहीम हाती घेवुन राष्ट्रध्वज उतरवुन घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष  डॉ.संतोष मुंडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा